Anil Parab | रिसॉर्ट माझं नाही, हिंमत असेल तर तोडून दाखवा
दापोलीतल्या एक रिसॉर्टवरून किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आक्रमक झाले आहेत. हे रिसॉर्ट बेकायदेशीर आहे आणि शिवसेना नेते अनिल परबांच्या (Anil Parab) मालकिचे आहे, असा आरोप किरीट सोमय्या सतत करत आहेत.
दापोलीतल्या एक रिसॉर्टवरून किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आक्रमक झाले आहेत. हे रिसॉर्ट बेकायदेशीर आहे आणि शिवसेना नेते अनिल परबांच्या (Anil Parab) मालकिचे आहे, असा आरोप किरीट सोमय्या सतत करत आहेत. त्या रिसॉर्टची पाहणी करण्यासाठी सोमय्या कोकणात गेले आहेत. मात्र शिवसेनेकडूनही (Shiv sena) किरीट सोमय्या यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. गेल्या अनेक दिवसांपासून अनिल परब हे रिसॉर्ट माझं नाही असे सांगत आहेत. याबाबत ज्या चौकशा करायच्या होत्या त्या झालेल्या आहेत. मी कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे. असेही परब म्हणाले. तसेच किरीट सोमय्या पालिकेचे नोकर आहेत. ते वातावरण खराब करत आहेत. सोमय्या यांच्यामुळे जे रोजगार करणारे आहेत ते भयभीत झालेले आहेत, त्यांनी पोलिसांना तक्रार केली आहे, असेही परबांनी सांगितले आहे.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन

