Kirit Somaiya : कोणत्या कायद्यानुसार नोटीस देता? नोटीशीवर सही करण्यास नकार; सोमय्यांना कशेडी घाटात अडवलं

Kirit Somaiya : कोणत्या कायद्यानुसार नोटीस देता? नोटीशीवर सही करण्यास नकार; सोमय्यांना कशेडी घाटात अडवलं
किरीट सोमय्या आणि पोलीस यांच्यात वाद
Image Credit source: tv9

दापोलीतल्या एक रिसॉर्टवरून किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. हे रिसॉर्ट बेकायदेशीर आहे आणि शिवसेना नेते अनिल परबांच्या मालकिचे आहे, असा आरोप किरीट सोमय्या सतत करत आहेत. त्याच रिसॉर्टची पाहणी करण्यासाठी सोमय्या कोकणात गेले आहेत.

मनोज लेले

| Edited By: दादासाहेब कारंडे

Mar 26, 2022 | 3:59 PM

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) महाविकास आघाडीवर रोज तुटून पडत आहे. कधी संजय राऊत, कधी नवाब मलिक, कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) आणि आज अनिल परब(Anil Parab), किरीट सोमय्यांची आरोपांची मालिका संपत नाहीये. आता दापोलीतल्या एक रिसॉर्टवरून किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. हे रिसॉर्ट बेकायदेशीर आहे आणि शिवसेना नेते अनिल परबांच्या मालकिचे आहे, असा आरोप किरीट सोमय्या सतत करत आहेत. त्यात रिसॉर्टची पाहणी करण्यासाठी सोमय्या कोकणात गेले आहेत. मात्र आधी सोमय्यांना राष्ट्रवादीचे नेते संजय कदम यांनी कडकडीत इशारा दिला होता. किरीट सोमय्यांनी येऊनच दाखवावं, हे कोकण आहे, गुजरात नाही, आम्ही त्यांना अडवणार आहे. किरीट सोमय्यांच्या येण्याने पर्यटनावर परिणाम होईल असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.

पोलीस आणि सोमय्या यांच्यात वाद

मात्र राष्ट्रवादीचा इशारा झुगारून सोमय्या कोकणात पोहोचले. मात्र कशेडी घाटता त्यांना पोलिसांनी अडवलं आणि नोटीस घेण्यास सांगितली. मात्र यावेळी पोलीस आणि सोमय्या यांच्यात वाद झल्याचे दिसून आले. पोलीस अधिकारी निशा जाधव यांनी कशेडी घाटात सोमय्यांचा ताफा अडवला अडवला. जिल्हा बंदी नाही. जमावबंदीचा आदेश आहे, असे पोलिसांनी यावेळी सोमय्यांना सांगितले. कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला कायद्यानुसार वागलं पाहजे. मला झेड प्लस सुरक्षा आहे. त्यामुळे फिरणं कसे नाकारता? ही नोटीस बेकायदेशीर आहे. मी कशी स्वीकारणार? असा सवाल पोलिसांना सोमय्यांना केला. सात खून केले सही करा, असं थोडीच होतं. यापूर्वी तुम्ही कुणाला थांबवलं का? कालपर्यंत सर्व गाड्यांना तुम्ही नोटीस दिली का? मला झेड सुरक्षा आहे. उलट तुम्ही माझी सुरक्षा करायला पाहिजे. सह्या कशाला देणार कोणत्या कायद्यांतर्गत? असा वाद पोलीस आणि सोमय्या यांच्या रंगला.
धुलिवंदन झालं.

पोलिसांना रिसॉर्टबाबत बोलायचा अधिकार काय?

यावेळी पोलिसांनी सांगितलं प्रत्येकाचा उद्देश वेगळा असतो. मात्र तुम्ही माझा उद्देश लिहून द्या, प्रत्येकाची सही घेता का? असा सवाल पुन्हा सोमय्या यांनी केला. साई रिसोर्ट बंद पडल्यामुळे स्थानिक लोकांचा रोजी रोटीचा प्रश्न निर्माण होणार असं नोटीशीत लिहिलंय. सीआरझेडमध्ये बांधकाम होऊ शकत नाही. हा आदेश भारत सरकारने दिला आहे. हे पोलीस अधिकारी समजातात काय त्यांनी कोणत्या अधिकारात असं नमूद केलंय? तुम्हाला अधिकार आहेत का? माझ्या बापाचा कायदा नाही. ही तुमची ज्युरिस्डिक्सन आहे का? तुम्ही शिवसेनेचे प्रमुख आहात का? असे शंभर सवाल सोमय्या यांनी पोलिसांना केले. त्यांना अडवल्यानंतरही ते गाडीत बसून पुन्हा दापोलीकडे रवाना झाले. त्यामुळे आता कोकणात पुन्हा हायव्होल्टेज ड्रामा होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Aurangabad | शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात वंचित आघाडी आक्रमक, औरंगाबाद, परभणीत आंदोलन

Gopichand Padalkar यांचा बोलविता धनी कोण? अमोल मिटकरी यांचा घणाघात

Akola | शिवसेना आमदार संतोष बांगरला राज्यात फिरू देणार नाही, वंचितचे राजेंद्र पातोडे असं का म्हणाले?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें