Saif Ali Khan Attack : रक्तबंबाळ सैफचा जीव वाचवणाऱ्या ‘रियल लाइफ हिरो’ला मुंबईकरांचा सॅल्यूट, असा केला सन्मान
मुंबईकर नागरिकांकडून रिक्षाचालक भजन सिंह राणा यांचा सन्मान करण्यात आलाय. भजन सिंह राणा यांनी सैफवर हल्ला झालेला असताना कोणतीही विचारपूस न करता त्याला वेळेत लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
अभिनेता सैफ अली खानवर आरोपीने चाकूने हल्ला केल्यानंतर सैफ गंभीर जखमी झाला होता. अंगावर वार आणि रंक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या सैफला तत्काळ लिलावती रूग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आलं. मात्र ज्या रिक्षातून सैफला रूग्णालयातून नेण्यात आलं त्या रिक्षाचालकाला मुंबईकरांकडून सॅल्यूट करण्यात आलंय. मुंबईकर नागरिकांकडून रिक्षाचालक भजन सिंह राणा यांचा सन्मान करण्यात आलाय. भजन सिंह राणा यांनी सैफवर हल्ला झालेला असताना कोणतीही विचारपूस न करता त्याला वेळेत लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रिक्षाचालक भजन सिंह राणा याची अद्याप सैफने देखील दखल घेतली नव्हती त्यापूर्वीच मुंबईकरांनी रिक्षाचालक भजन सिंह राणा यांचा शाल देऊन सन्मान करण्यात आला. मध्यरात्री घडलेल्या या हल्ल्यानंतर रिक्षाचालकानेच तो प्रसंग सांगितला. ‘एक व्यक्ती गेटमधून बाहेर आला, त्याच्यासोबत एक मुलगा देखील होता. त्याने पांढऱ्या कलरचा ड्रेस घातलेला होता. त्याचा शर्ट पूर्णपणे रक्तानं भरलेला होता. मला लिलावती रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. मी पाच ते सहा मिनिटांमध्ये रिक्षा घेऊन लिलावती रुग्णालयात पोहोचलो. परंतु तोपर्यंत मला माहिती नव्हते की तो सैफ अली खान आहे. जेव्हा माझी रिक्षा रुग्णालयाबाहेर पोहोचली तेव्हा तो खाली उतरला आणि जोरात ओरडला ‘मै सैफ अली खान हूं, जल्दी स्ट्रेचर लाओ’ तेव्हा मला कळालं की आपल्या रिक्षामध्ये सैफ अली खान बसला होता.’असं त्याने सांगितले.

'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा

Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव

EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल

संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
