‘राज्यात दंगल सदृश्य घटना शरद पवार आणि सतेज पाटील यांच्यामुळे…’; भाजप नेत्याचा मोठा आरोप
काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यंनी आणि काँग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी चेतावणी दिली होती. त्यानंतर कोल्हापूरमध्ये दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली. यावरून राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी निवडणूका जवळ आल्या की अशा घटना घटत असतात. त्यामुळे मुस्लिम समाजानं सतर्क राहायला हवं असं म्हटलं होतं.
आळंदी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यात दंगल सदृश्य घटना घडत आहेत. यावरून काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यंनी आणि काँग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी चेतावणी दिली होती. त्यानंतर कोल्हापूरमध्ये दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली. यावरून राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी निवडणूका जवळ आल्या की अशा घटना घटत असतात. त्यामुळे मुस्लिम समाजानं सतर्क राहायला हवं असं म्हटलं होतं. त्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, आधी मुश्रीफ यांनी इतिहास काढून बघावं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या बाहेर गेली तेव्हा तेव्हा समाजामध्ये तेड निर्माण करण्याच्या घटनांना प्रोत्साहन दिलं आहे. याच्याआधी जर शरद पवार यांनी ट्विट करत मुस्लिम आणि ख्रिश्चन या राज्यात सुरक्षित नाही असं म्हटलं नसतं तर संभाजीनगरची घटना घडली नसती. जर बंटी पाटील यांनी कोल्हापूरमध्ये चेतावणीखोर वक्तव्य केलं नसतं तर तेथेही दंगल झाली नसती असा आरोप केला आहे.
Published on: Jun 13, 2023 10:06 AM
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
