Ritu Tawade | महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार

Ritu Tawade | महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार

| Updated on: Apr 19, 2026 | 1:28 PM

लोकसभेत शुक्रवारी केंद्र सरकारने महिला आरक्षण अर्थात नारी शक्ती वंदन विधेयक मांडले होते, ते विधेयक नामंजूर झाले. काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी या विधेयकाचा विरोध केला. काँग्रेसच्या या भूमिकेच्या विरोधात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी काळी साडी परिधान करून सभेत येण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसभेत शुक्रवारी केंद्र सरकारने महिला आरक्षण अर्थात नारी शक्ती वंदन विधेयक मांडले होते, ते विधेयक नामंजूर झाले. काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी या विधेयकाचा विरोध केला. काँग्रेसच्या या भूमिकेच्या विरोधात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी काळी साडी परिधान करून सभेत येण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडील राजकीय घडामोडींमुळे राज्यात वातावरण तापले असून या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी हा मार्ग निवडला.

तावडे यांनी सांगितले की, काँग्रेसच्या या निर्णयांमुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे, त्यामुळे शांततेत पण ठामपणे विरोध नोंदवण्यासाठी त्या काळी साडी नेसून सभेत येणार आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

माध्यमांशी बोलताना त्यांनी वर्षा गायकवाड यांना देखील खडेबोल सुनावले. आगामी काळात या निषेधाचा राजकीय परिणाम काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Published on: Apr 19, 2026 01:28 PM
Follow Us