एकटीने पोलिसांची व्हॅन रोखणाऱ्या रिया अहिरबाबत मोठी अपडेट समोर, आक्षेपार्ह…

एकटीने पोलिसांची व्हॅन रोखणाऱ्या रिया अहिरबाबत मोठी अपडेट समोर, आक्षेपार्ह…

| Updated on: Jul 27, 2026 | 2:17 PM

NEET पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले होते. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळाला. 22 जुलै 2026 रोजी मुंबईतील दादर येथेही विद्यार्थी आणि तरुणांनी आंदोलन केले होते. याच आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या रिया अहिरने आता सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे.

रिया अहिरने सांगितले की, आंदोलनातील तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अपमानास्पद टिप्पणी आणि धमक्या मिळू लागल्या. सध्या हे सर्व ऑनलाइन सुरू असले तरी त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी भीती तिने व्यक्त केली.

तिने सांगितले की, या प्रकाराचा परिणाम तिच्या आई-वडिलांवर होऊ नये, अशी तिची इच्छा आहे. आंदोलनात विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी उभी राहिल्यानंतर आता स्वतःच्या सन्मानासाठीही आवाज उठवण्याची वेळ आल्याचे तिने म्हटले.

रिया अहिरने काही सोशल मीडिया क्रिएटर्सवर गंभीर आरोप केले आहेत. काही जणांनी ती, अडल्ट कंटेंट क्रिएटर असल्याचा खोटा दावा केला. तसेच तिचे एडिट केलेले बिकिनीतील फोटो शेअर करून दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याचा आरोपही तिने केला आहे. या प्रकरणाची सायबर सेलमार्फत चौकशी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Published on: Jul 27, 2026 2:17 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us