Rohit Arya : 5 लीटर पेट्रोल आणि फटाके घेऊन ये… रोहित आर्याच्या डोक्यात भयानक कट?; सहकाऱ्याने सांगितला झोप उडवणारा थरारक अनुभव
मुंबईतील आर.ए. स्टुडिओमध्ये घडलेल्या थरारक ओलीस नाट्याने मोठी खळबळ माजली. ऑडिशनसाठी आलेल्या अनेक मुलांना रोहित आर्याने ओलीस ठेवलं होतं. काल दुपारी रंगलेल्या या ओलीस नाट्यात अखेर पोलिसांनी ओली मुलांना सुखरूप बाहेर काढल. तर रोहित आर्याचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. यावेळी रोहित आर्यासोबत काम केलेल्या रोहन आहेरने संपूर्ण घटनाक्रम कथन करत आपबिती सांगितली.
पवई भागातील आर.ए. स्टुडिओमध्ये घडलेल्या लहान मुलांच्या ओलीस प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले आहे. या थरारक घटनेतील एक महत्त्वाचा साक्षीदार आणि रोहित आर्यासोबत काम करणारा प्रोजेक्ट मॅनेजर रोहन आहेरने घटनेपूर्वीचा आणि घटनेदरम्यानचा घटनाक्रम उलगडला आहे. रोहनने सांगितले की, तो २०१२-१३ पासून रोहित आर्यासोबत विविध प्रोजेक्ट्सवर काम करत होता. रोहित आर्यावर रोहनचा विश्वास होता, कारण त्यांनी यापूर्वी अनेक चित्रपटही एकत्र केले होते.
आर.ए.स्टुडिओत ऑडिशन कशी झाली, निवड कशी केली हे त्याने नमूद केले. तसेच काल मुलांना ओलीस ठेवण्यापूर्वी काय घडलं, रोहितशी काय बोलणं झालं, त्याने काय मेसेज केला होता याची त्याने सविस्तर माहिती दिली. रोहितने स्टुडिओ मालकाशी बोलून बुकिंग आर.ए. स्टुडिओचे बुकिंग काल दुपारी (30 ऑक्टोबर) 12 वाजेपर्यंत वाढवून घेतले. याच दिवशी सकाळी रोहितने रोहनला 5 लिटर पेट्रोल, बाटली आणि फटाके घेऊन येण्याचा मेसेज पाठवला.
लहान मुलांच्या शूटिंगदरम्यान ज्वलनशील वस्तू न वापरण्याच्या नियमांमुळे रोहनने ते साहित्य आणण्यास नकार दिला. नंतर त्याला कळले की, रोहितने ते साहित्य स्वतःच आणले होते. जेव्हा रोहन स्टुडिओमध्ये पोहोचला, तेव्हा स्पॉट बॉयने त्याला वर जायला मनाई केली, कारण रोहितने रोहनला खालीच थांबवण्यास सांगितले होते. संशय आल्यावर रोहन खाली थांबला. नंतर काय काय घडलं याचा थराराक अनुभव रोहनने कथन केला.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

