Rohit Patil | रोहित यांचं महिन्याआधीचं गाजलेलं भाषण आज खरं झालं | Nagar Panchayat Election 2022

| Updated on: Jan 19, 2022 | 6:06 PM

या विजयचा सगळ्यात जास्त आनंद आबांशिवाय दुसऱ्या कुणालाच झाला नसता, असं त्यांनी पहिली प्रतिक्रिया देताना म्हटलंय. कवठेमहाकांळ नगरपंचायतीत रंगतदार लढत पाहायला मिळाली होती. या निवडणुकीत रोहित पाटील यांनी नेतृत्त्व करत नगरपंचायतीवर विजय मिळला आहे.

Follow us on

YouTube video player

कवठेमहाकांळ : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील (RR Patil) यांचे सुपुत्र रोहित पाटील(Rohit Patil) यांनी कवळेमहाकांळ निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर प्रचारादरम्यान विरोधकांना उत्तर देताना केलेलं विधान तंतोतंत खरं ठरलंय. विरोधकांनी टीका करताना रोहित पाटील यांच्यावर निशाणा साधताना ‘त्याला बाप आठवेल’ असा टोला लगावला होता. दरम्यान, या विरोधकांच्या वक्तव्यांना उत्तर देताना विरोधकांना निकालानंतर माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही, असं विधान केलं होतं. निवडणूक निकालानंतर अगदी तसंच झालंय. रोहित पाटील यांनी कवठेमहाकांळ नगरपंचायीतवर विजयी झेंडा फडकवला आहेच. या निकालानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया देताना आपल्या वडिलांचं एकहाती सत्ता मिळवण्याचं स्वप्न पूर्ण करु शकलो आणि आज मी माझ्या वडिलांना खरंच मीस करतोय, असं म्हटलंय. आज मला निश्चितच आबांची आठवण येतेय, असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान, या विजयचा सगळ्यात जास्त आनंद आबांशिवाय दुसऱ्या कुणालाच झाला नसता, असं त्यांनी पहिली प्रतिक्रिया देताना म्हटलंय. कवठेमहाकांळ नगरपंचायतीत रंगतदार लढत पाहायला मिळाली होती. या निवडणुकीत रोहित पाटील यांनी नेतृत्त्व करत नगरपंचायतीवर विजय मिळला आहे.