Rohit Pawar | 14 जणांच्या मृत्यूनंतर रोहित पवार आक्रमक!; दारू अड्ड्यावर थेट धडक, केली तोडफोड

Rohit Pawar | 14 जणांच्या मृत्यूनंतर रोहित पवार आक्रमक!; दारू अड्ड्यावर थेट धडक, केली तोडफोड

| Updated on: May 29, 2026 | 2:25 PM

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरलं असताना आता या प्रकरणावरून राजकीय वातावरणही तापलं आहे. विषारी दारू प्रकरणात जवळपास 14 जणांचा मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी थेट घटनास्थळी जाऊन संतप्त प्रतिक्रिया दिली. यावेळी रोहित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी संबंधित दारू अड्ड्यावर तोडफोड करत निषेध व्यक्त केला.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरलं असताना आता या प्रकरणावरून राजकीय वातावरणही तापलं आहे. विषारी दारू प्रकरणात जवळपास 14 जणांचा मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी थेट घटनास्थळी जाऊन संतप्त प्रतिक्रिया दिली. यावेळी रोहित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी संबंधित दारू अड्ड्यावर तोडफोड करत निषेध व्यक्त केला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विकल्या गेलेल्या विषारी दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी योगेश वानखेडे याला अटक केली असून दारू अड्ड्याचा मालक कर्नलसिंह विरखा याच्यासह एकूण आठ आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.

दरम्यान, या घटनेनंतर रोहित पवार स्वतः संबंधित दारू अड्ड्यावर पोहोचले. त्यांनी कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी लावलेले पत्रे उखडून टाकत काऊंटरची तोडफोड केली. यावेळी माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “गरीब माणूस मेल्यानंतर आम्ही शांत बसलो तर राजकारणात आम्ही फक्त टाईमपास करायला आलोय का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, “अशा वेळी सिस्टीम कमी पडते, त्यामुळे आम्हालाच आक्रमक व्हावं लागतं. लहान मुलींवर अत्याचार होतात, महिलांवर अत्याचार होतात, पण सिस्टीम वेळेवर मदत करत नाही,” असंही ते म्हणाले.
विषारी दारू प्रकरणानंतर परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

Published on: May 29, 2026 2:25 PM
Follow Us