‘माझी झोपडी जाळण्याचे… खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांचा व्हॉट्सअप स्टेटस, फोटो अन् कविता तुफान चर्चेत

‘माझी झोपडी जाळण्याचे… खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांचा व्हॉट्सअप स्टेटस, फोटो अन् कविता तुफान चर्चेत

| Updated on: Jun 10, 2026 | 5:48 PM

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा राहिलेल्या रुपाली चाकणकर सध्या चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. नाशिकमधील भोंदू अशोक खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आधी रुपाली चाकणकरांना त्यांच्या पदावरून पाय उतरावा लागला. इतकेच नाही तर त्यांना एसआयटी चौकशीलाही सामोरे जावे लागले होते. यांनंतर त्यांचा व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत आला आहे.

अलीकडेच चाकणकरांचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यांनी यामध्ये खरातशी कुठेही संबंध नसल्याचे सांगितले. AI चा आणि खोट्या माहितीचा वापर करून त्यांना फसवण्यात आले, असेही त्यांनी सांगितले आहे. इतकेच नाही तर जमिनीच्या व्यवहार प्रकरणी कोणतीच माहिती नसून मी पार्टनर नव्हतेच, असे चाकणकर म्हणाल्या आहेत. ही माहिती दिल्यानंतर चाकणकरानी आणखी एक महत्त्वाची माहिती दिली, त्या म्हणाल्या, “माझ्यावर आशा मिरगे (महिला आयोग सदस्या) यांच्यासह अनेकांनी संधी साधून चिखलफेक केली. या सर्वांना कालच नोटीस आली आहे. दिल्ली हायकोर्टात या सगळ्यांना उपस्थित राहावे लागणार आहे, तिथे मी देखील असेन.”

या प्रकरणानंतर आता चाकणकरांचा व्हॉट्सअप स्टेटस तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी कवितेतून अनेकांना जोरदार टोला लगावला आहे. त्यांनी लिहिलं ‘माझी झोपडी जाळण्याचे केलेत कैक कावे, जळेल झोपडी माझी आग अशी ज्वलंत नाही’. सध्या त्यांच्या या स्टेटसची सर्वत्र चर्चा आहे.

Published on: Jun 10, 2026 5:48 PM
Follow Us