Rupali Chakankar | किरण मानेंना काढून टाकल्याबाबत खुलासा करावा, रुपाली चाकणकरांचं निर्मात्यांना पत्र

| Updated on: Jan 17, 2022 | 7:32 PM

किरण माने यांच्या पत्नी ललीता माने ( lalita mane) यांनी महिला आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर रुपाली चाकणकरांनी मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसला पत्र लिहून किरण माने यांना मालिकेतून का काढलं, याचा जाब विचारला आहे. ‘या सगळ्या प्रकाराचं स्पष्टीकरण द्या’, असं चाकणकर यांनी म्हटलं आहे.

Follow us on

YouTube video player

मुंबई: अभिनेते किरण माने (kiran mane) यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट आणि त्यानंतर त्यांना मालिकेतून काढणं हे प्रकरण सतत नवं वळण घेतंय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (State Women’s Commission president Rupali Chakankar) यांनी आता या प्रकरणात एन्ट्री घेतली आहे. किरण माने यांच्या पत्नी ललीता माने ( lalita mane) यांनी महिला आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर रुपाली चाकणकरांनी मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसला पत्र लिहून किरण माने यांना मालिकेतून का काढलं, याचा जाब विचारला आहे. ‘या सगळ्या प्रकाराचं स्पष्टीकरण द्या’, असं चाकणकर यांनी म्हटलं आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पॅनोरामा इंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेच्या पदाधिकारी सुझाना घई यांना एक पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी किरण माने यांच्या पत्नी ललीता माने यांच्या तक्रारीचा उल्लेख केला आहे. पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे, ‘किरण माने यांच्या पत्नी ललीता माने यांनी आपल्याला या सगळ्या प्रकाराचा मानसिक त्रास होत असल्याचं म्हटलंय. सोबतच, आर्थिक चणचणीला सामोरं जावं लागत असल्याचं म्हटलंय. या सगळ्याची दखल घेत या निर्मिती संस्थेने किरण माने यांना मालिकेतून का काढलं याचं स्पष्टीकरण द्यावं’, असं पत्र रुपाली चाकणकर यांनी लिहिलंय. कलावंतांनी वैचारिक राजकीय भूमिका मांडल्यामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकणे ही बाब कलाकाराच्या वैचारिक व्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला करणारी असल्यामुळे याबाबतीतचा लेखी खुलासा राज्य महिला आयोगास सादर करण्याचे निर्देश या मालिकेच्या निर्मात्यांना देण्यात आलेले आहेत.