आधी उद्योग आता आमचे देवही पळवले, ‘शंख’ फुंकावाच लागेल!; सामनातून राज्य सरकारवर घणाघात
आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवण्यात आला आहे. आसाम सरकारच्या नव्या दाव्यावरून राज्य सरकारला लक्ष करण्यात आलं आहे. पाहा...
मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवण्यात आला आहे. आसाम सरकारच्या नव्या दाव्यावरून राज्य सरकारला लक्ष करण्यात आलं आहे. “माझे ते माझे आणि तुझे तेदेखील माझेच, असा उफराटा कारभार सध्या केंद्र आणि इतर भाजपशासित राज्यांकडून महाराष्ट्राबाबत सुरू आहे. लाचार मिंधे सरकारमुळे तो महाराष्ट्राच्या मुळावर तर उठला आहेच , पण महाराष्ट्र धर्माच्या अस्तित्वालाही धडका देऊ लागला आहे . देव , देश आणि धर्मासाठी प्राण हाती घेणारा महाराष्ट्र हतबल करण्याचे मोठे षड्यंत्र रचले गेले आहे . केंद्र आणि भाजपशासित राज्यांकडून महाराष्ट्राचे उद्योग , अर्थकारण , पाणी आणि बरेच काही पळविण्याचे प्रकार या कटकारस्थानाचाच भाग आहेत . आता तर त्यांनी आमचे देवही पळविले ! आमच्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगावरच आसामच्या भाजप सरकारने मालकी हक्क सांगितला . लाचार मिंधे सरकारकडून याविरोधात काहीच होणार नाही . राज्यातील जनतेला शिवशंभोंचा शंख फुंकावाच लागेल”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
Published on: Feb 16, 2023 09:08 AM
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
