Khot-Padalkar Video : ‘राज्यात गुंडाराज..’, तरुणाला गरम सळईने चटके दिल्याच्या प्रकरणावरून सदाभाऊ खोत अन् पडळकर भडकले
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आता तिसरा दिवस असताना विधानभवनाच्या आवारात सदाभाऊ खोत आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
जालना जिल्ह्यातील आनवा नावाच्या गावात एका तरूणाला तप्त लोखंडी सळईने चटके दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. गेल्या एक ते दोन दिवसांपासून या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसताय. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटताना दिसताय. अशातच विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आता तिसरा दिवस असताना विधानभवनाच्या आवारात सदाभाऊ खोत आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. याप्रकरणी राज्यातील गुंडाराज कधी संपणार? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला आहे. तर या घडलेल्या संतापजनक घटनेप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती देत बाकी आरोपींवर मकोका लावायला हवा, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली. दरम्यान, एसीपींनी ३०७ चा गुन्हा दाखल करत एकाला अटक केली असल्याची माहिती देखील सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली.