Sambhaji Bhide : वादग्रस्त वक्तव्य चिघळले; यवतमाळमध्ये व्याख्यानाआधीच भिडे यांचे पोस्टर फाडले; तणावाचे वातावरण
आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पुरोगामी संघटना, प्रहार आणि आंबेडकरी संघटनांनी भिडे यांच्या या वक्तव्याचा जोरदार निषेध केला. तर आमरावती, पुणे आणि कोल्हापूरात जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत.
यवतमाळ, 29 जुलै 2023 | शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पुरोगामी संघटना, प्रहार आणि आंबेडकरी संघटनांनी भिडे यांच्या या वक्तव्याचा जोरदार निषेध केला. तर आमरावती, पुणे आणि कोल्हापूरात जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत. याचदरम्यान आता अमरावतीनंतर आज ११ वाजता यवतमाळ येथे भिडे यांचे व्याख्यान होणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी येथील आर्ने रोडवर स्वागत फटक लावण्यात आलेले होते. मात्र या वादग्रस्त वक्तव्यानंतर येथील पोस्टर्स अज्ञातांनी फाडले आहेत. तर पोस्टर फाडल्याने यवतमाळमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. तर पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. Sambhaji Bhides welcome posters
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी

