शिवसेनेत मोठा भुकंप! अब्दुल सत्तारांना पुन्हा झटका, 14 जणांच्या अर्जावर… थेट कोर्टापर्यंत गेलं प्रकरण

शिवसेनेत मोठा भुकंप! अब्दुल सत्तारांना पुन्हा झटका, 14 जणांच्या अर्जावर… थेट कोर्टापर्यंत गेलं प्रकरण

| Updated on: Jun 09, 2026 | 1:28 PM

राज्यात विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनेही राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आले होते. सोमवारी उशिरापर्यंत अर्ज छाननीची प्रक्रिया सुरू होती.

विधानपरिषद निवडणुकीत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या आमदार अब्दुल सत्तार यांनी अखेर आपल्या मुलाचा अर्ज मागे घेतला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी माघार घेतल्याची चर्चा होती. त्यामुळे भाजप उमेदवाराचा मार्ग मोकळा झाला. या प्रकरणाने महायुतीत मोठा तिढा निर्माण केला होता. आता पुन्हा शिवसेना आणि महायुतीतील संघर्ष समोर येणार की काय अशी शंका आहे.

दरम्यान, संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदासाठी आमदार संजना जाधव, रमेश बोरनारे आणि समीर सत्तार यांच्यासह 14 जणांच्या अर्जांवर आक्षेप नोंदवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नाही तर या प्रकरणी आता सत्तार कोर्टात धाव घेणार असं सागितलं जात आहे. यावेली शुल्लक कारणांवरून अर्ज अवैध ठरवला असं सत्तारांनी फोनवरुन सांगतलं आहे.

छाननीनंतर अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार तसेच माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांचा अर्ज बाद झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Published on: Jun 09, 2026 1:28 PM
Follow Us