Marathi News » Videos » Sambhajiraje chhatrapati join shivsena cm uddhav thackeray s phone call
Video : शिवबंधन बांधण्यासाठी ‘वर्षा’वर या, उद्धव ठाकरेंचा संभाजीराजे छत्रपतींना निरोप
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आग्रही राहिली. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. अशावेळी संभाजीराजे आणि शिवसेना नेत्यांमध्ये हॉटेल ट्रायडंटमध्ये महत्वाची बैठक पार पडली. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संभाजीराजेंना फोन गेला आणि उद्या दुपारी 12 वाजता शिवबंधन बांधण्यासाठी वर्षावर येण्याचा निरोप त्यांनी दिल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांचा शिवसेना प्रवेश आता निश्चित […]
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आग्रही राहिली. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. अशावेळी संभाजीराजे आणि शिवसेना नेत्यांमध्ये हॉटेल ट्रायडंटमध्ये महत्वाची बैठक पार पडली. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संभाजीराजेंना फोन गेला आणि उद्या दुपारी 12 वाजता शिवबंधन बांधण्यासाठी वर्षावर येण्याचा निरोप त्यांनी दिल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांचा शिवसेना प्रवेश आता निश्चित मानला जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही संभाजीराजेंना फोन केल्याची माहिती मिळत आहे.