जोवर प्रत्येक शिवभक्ताला महाराजांना वंदन करता येणार नाही, तोवर मीही नतमस्तक होणार नाही; संभाजीराजे भूमिकेवर ठाम
आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्यानिमित्त शिवनेरी किल्ल्यावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले. पाहा...
Shivjayanti 2023 : आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्यानिमित्त शिवनेरी किल्ल्यावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. यावेळी कार्यक्रमस्थळाच्या काही पावलं दूर संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शिवभक्तांना शिवरायांना अभिवादन करता यावं, यासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. शिवनेरी किल्ल्यावर आलेल्या प्रत्येक शिवभक्ताला महाराजांना वंदन करता येत नाही, तोवर मीही नतमस्तक होणार नाही, अशी भूमिका संभाजीराजेंनी घेतली. यावेळी संभाजीराजे तुम्ही आमचं नेतृत्व करा, अशी आर्त हाक शिवनेरी किल्ल्यावर जमलेल्या शिवभक्तांनी दिली.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम

