Sameer Wankhede | आर्यन खानला जामीन मिळाल्यासंदर्भात समीर वानखेडेंची ‘नो कमेंट’
आर्यन खानला जामीन मिळाल्यासंदर्भात एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंना माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांची प्रतिक्रिया विचारली असता वानखेडे यांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलं.
गेल्या 25 दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यन खानला अखेर जामीन मिळाला आहे. त्याच्यासह मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन मिळाला असून हे तिघेही उद्या तुरुंगातून बाहेर येणार आहेत. आर्यनच्या न्यायालयात गेल्या तीन दिवसांपासून युक्तिवाद सुरू होता. त्यानंतर अखेर कोर्टाने त्याला जामीन दिला आहे.आज सलग तिसऱ्या दिवशी आर्यनच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. आर्यनच्या बाजूने ज्येष्ठ मुकूल रोहतगी यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर हा जामीन मंजूर करण्यात आला. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, आर्यन खानला जामीन मिळाल्यासंदर्भात एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंना माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांची प्रतिक्रिया विचारली असता वानखेडे यांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलं.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

