Havey rain: सांगलीला अवकाळी पावसाचा तडाखा; पावसामुळे शेतमालाचे नुकसान

अवकाळी पाऊसामुळे भुईमूग, मटकी, कलिंगण, मुग अशा विविध प्रकारच्या शेतमालाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Apr 25, 2022 | 7:06 PM

सांगली : जिल्ह्यातील तासगावमध्ये (Tasgaon) जोरदार वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पाऊसाने हजेरी लावली. तसेच तासगावमधील बेदाणा शेडमध्ये अचानक सुरू झालेल्या वादळवारा आणि पाऊसामुळे बेदाणा सौदे थांबवावे लागले. अचानक आलेल्या पावसामुळे (rains) शेतकरी आणि व्यापारी याची मोठी तारांबळ उडाली आहे. या अवकाळी पावसामुळे सगळ्यात मोठे नुसकान हे बेदाणा (raisins) व्यापाऱ्यांचे झाले. तर भुईमूग, मटकी, कलिंगण, मुग अशा विविध प्रकारच्या शेतमालाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अशाच अवकाळीचा तडाखा रायगडलाही बसल्याने आंबा पिकाचे ही नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें