Sangli Flood | पुराचं पाणी ओसरलं, सांगलीतील पलुसचा अमणापूर पूल आज खुला होणार

पलुस तालुक्यातील महापूराचे पाणी अतिशय मंदगतीने ओसरत आहे. भिलवडी पूलावरून पाणी ओसरले आहे पुलावरून दुचाकी, व छोट्या चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू आहे. तर आमणापूर - अंकलखोप पुलावर सुमारे अर्धा फुट पाणी आहे. प्रशासनाकडून तपासणी नंतरच आज सकाळपासून औपचारिक रित्या हा आमणापूर पूल सुरू होणार आहे.

पलुस तालुक्यातील महापूराचे पाणी अतिशय मंदगतीने ओसरत आहे. भिलवडी पूलावरून पाणी ओसरले आहे पुलावरून दुचाकी, व छोट्या चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू आहे. तर आमणापूर – अंकलखोप पुलावर सुमारे अर्धा फुट पाणी आहे. प्रशासनाकडून तपासणी नंतरच आज सकाळपासून औपचारिक रित्या हा आमणापूर पूल सुरू होणार आहे. यामुळे पलुसचा तालुक्याचा दक्षिण भागाशी तुटलेला संपर्क पुन्हा सुरू होणार आहे. पाणीपातळी ओसरत असताना तालुक्यातील अनेक रस्ते चिखलमय झाले आहेत. पलुस तालुक्यातील पुणदी तर्फ वाळवा येथील पुनदी – जुनेखेड पुलावरील पाणी ओसरले आहे. तर महापूराच्या प्रचंड प्रवाहाने सर्वच पुलाचा संरक्षक पाईप वाकून मोठे नुकसान झाले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI