शिवसेना फुटीचं खापर ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदावर तर पवारांचाच शिंदेंना विरोध… राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
शिवसेना फुटीवरून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाला जबाबदार ठरवलंय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती असं शिंदे म्हणाले. त्यानंतर राऊतांनीही शरद पवारांचाच शिंदेंच्या नावावर विरोध होता असं सांगून गौप्यस्फोट केला आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती असं खुद्द एकनाथ शिंदे म्हणाले. म्हणजेच निकालानंतर भाजपची साथ सोडत महाविकास आघाडीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे शिवसेना फुटली असं एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे. शिवसेना फुटीला शिंदे यांनी ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाचं कारण सांगितलं. आणि संजय राऊतांनी शरद पवारांवरून गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीमध्ये एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री होणार होते. पण शरद पवारांनी त्यांच्या नावाला विरोध केला असा दावा राऊतांनी केलाय. संजय राऊत पवार यांच्या विरोधाचा दाखला देतायत, त्यावरून बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच भाषणात त्यावर भाष्य केलं होतं. आपण अजित पवारांनाही विचारलं तेव्हा दादांनी आमचा विरोध असण्याचं कारणच नव्हतं असं सांगितल्याचा किस्सा शिंदे यांनी सार्वजनिक केला. शरद पवारांचा शिंदे यांना विरोध होता हे सांगताना राऊतांनी पुन्हा भाजपही शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदच्या आडवी कशी आली यावरून ही टीका केली आहे. भाजपनं 50-50 चा शब्द पाळला असता तर शिंदेच मुख्यमंत्री झाले असते असं राऊत म्हणाले. शिंदे यांच्या नावावर विरोध होता की नाही हे शरद पवार पुढच्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट करतील. मात्र आत्तापर्यंत विशेषतः संजय राऊत शरद पवारांकडे बोट दाखवत नव्हते. पण दिल्लीत पवारांच्या हस्ते शिंदे यांचा सत्कार झाला आणि तिथूनच ठाकरे यांच्या शिवसेनेचं बिनसलं. त्याचाच परिणाम म्हणून राऊतांनी पवारांवरून गौप्यस्फोट केला. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

