Sanjay Raut | शिंदे गटच आमचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू, संजय राऊत कडाडले; भाजपवरही गंभीर आरोप

Sanjay Raut | शिंदे गटच आमचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू, संजय राऊत कडाडले; भाजपवरही गंभीर आरोप

| Updated on: Jun 03, 2026 | 12:01 PM

नाशिकमधील स्थानिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत समीकरणांबाबत विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शिंदे गटाचा प्रभाव रोखण्यासाठी भाजपमधील काही बंडखोरांना अप्रत्यक्ष पाठबळ दिले जात असल्याच्या चर्चांवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नाशिकमधील स्थानिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत समीकरणांबाबत विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शिंदे गटाचा प्रभाव रोखण्यासाठी भाजपमधील काही बंडखोरांना अप्रत्यक्ष पाठबळ दिले जात असल्याच्या चर्चांवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, या चर्चांमागील वास्तव काय आहे हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल. शिंदे गटाच्या राजकीय ताकदीवर भाष्य करताना त्यांनी शिंदे सेना ही महाराष्ट्रातील मोठी जनाधार असलेली ताकद नसून ती पैशाच्या बळावर उभी असलेली शक्ती असल्याचा आरोप केला. तसेच हा पैसा ठेकेदारी आणि भ्रष्ट मार्गाने मिळाल्याचा दावाही त्यांनी केला.

राऊत यांनी पुढे सांगितले की, अशा प्रकारचे राजकारण सर्व स्तरांवर थांबले पाहिजे, ही त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. मात्र, याचा अर्थ भाजप हा पूर्णपणे निष्कलंक किंवा पवित्र पक्ष आहे, असेही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) आणि शिंदे गटातील संघर्ष अद्याप कायम असल्याचे अधोरेखित करताना राऊत म्हणाले की, पण आमचा पहिला क्रमांकाचा शत्रू हा शिंदे गटच आहे, त्यांच्या या वक्तव्यामुळे नाशिकसह राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नाशिकमधील आगामी राजकीय घडामोडी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.

Published on: Jun 03, 2026 11:56 AM
Follow Us