बंडखोरीचा उद्रेक झालाय! संजय राऊतांची टीका
संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सात वर्षांच्या विलंबानंतर होणाऱ्या निवडणुकांमध्ये धमक्या, पैशांचे वाटप आणि उमेदवारांना माघार घेण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. बंडखोरीचा उद्रेक झाल्याचे सांगत, त्यांनी भाजपने नेते पळवण्यावर आणि अजित पवारांच्या भूमिकेवरही टीका केली.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या घडामोडींवर खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत भाष्य केले आहे. सात वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर होणाऱ्या निवडणुका सरळ मार्गाने होत नसल्याचा आरोप राऊत यांनी केला. धमक्या, दहशत आणि पैशाने माणसे विकत घेण्याचे प्रकार सर्रास सुरू असून, विकासकामांचे दावे करणाऱ्यांना या मार्गांचा अवलंब का करावा लागत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मुंबईत 70 जणांना बिनविरोध निवडून आणणे, हे महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अधःपतनाचे लक्षण असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. अजित पवार भारतीय जनता पक्षासोबत युतीत असतानाही त्यांच्या भ्रष्टाचारावर हल्ला करत असल्याचा उल्लेख करत, ही एक नुरा कुस्ती असल्याचा दावा राऊत यांनी केला. विरोधकांना जागाच न ठेवण्याचा हा प्रयत्न असून, मराठी मतांचे विभाजन करण्यासाठी एकनाथ शिंदे गटाचा वापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या निवडणुकीत अभूतपूर्व बंडखोऱ्या, मारामाऱ्या आणि उमेदवारी अर्ज पळवण्याचे प्रकार घडले, जे वेळेत निवडणुका झाल्या असत्या तर दिसले नसते, असे राऊत यांनी नमूद केले.
सामंतांच्या बॅगेची आयोगाकडून तपासणी, बॅगेत काय-काय? मंत्र्यानच सांगितल
...मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजितदादांवर ऐकरी भाषा अन्...
नितेश राणेंचे व्हिडीओ 11 तारखेला व्हायरल करू, सचिन अहिर यांचा निशाणा
मी टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यात घातली... फडणवीसांचा हल्लाबोल

