संजय राऊत संतापलेच! 92 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद झाल्यानंतर थेट…
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लाडकी बहिण योजनेवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केले. सरकारने 92 लाख महिलांची मतं मिळवण्यासाठी सरकारी तिजोरीचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच 3515 कोटी रुपयांचा निधी मतांसाठी वापरला जात असल्याचे ते म्हणाले. या संबंधीत ते नोटीसही देणार असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 10 पैकी 9 आमदार अस्वस्थ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या आमदारांना एनडीएसोबत जाण्याची इच्छा असल्याच्या चर्चेबाबत पत्रकारांनी संजय राऊत यांना प्रश्न विचारला.
यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हाच मूळ पक्ष असल्याचे सांगितले. तसेच पक्षातील अंतर्गत घडामोडींवर भाष्य करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.