Rahul Narwekar Video : सुरक्षा काढून घेईन…राहुल नार्वेकर यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, संजय राऊत यांची गंभीर टीका
राहुल नार्वेकर आणि हरिभाऊ राठोड यांच्यातील वादानंतर नार्वेकरांवर पदाचा गैरवापर केल्याचा आरोप होत आहे. कुलाब्यातील निवडणुकीत उमेदवारांना धमकावून बिनविरोध निवडीचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांना सभागृहाबाहेर अधिकार नसल्याचे सांगत कारवाईची मागणी केली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि हरिभाऊ राठोड यांच्यातील वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कुलाबा येथे नार्वेकर यांच्या कुटुंबातील तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अर्ज भरण्याच्या वेळी नार्वेकर उपस्थित असल्याने वादाला तोंड फुटले. उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यासाठी नार्वेकर आम्हाला धमक्या देत होते, असा आरोप हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. या घटनेनंतर खासदार संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विधानसभा अध्यक्षांना सभागृहाबाहेर सूचना देण्याचा अधिकार नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे. नार्वेकर यांनी पदाचा पूर्णपणे गैरवापर केला असून त्यांच्यावर रितसर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी राऊत यांनी केली आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीने आपल्या सुरक्षेचा गैरवापर करत गोंधळ निर्माण करणे योग्य नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
पुढच्या वर्षी मुंबई खड्डेमुक्त होणार; शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मौका सभी को मिलता है! भाषणातून धनंजय मुंडेंची डायलॉगबाजी
जिथं टेंडर, तिथं सरेंडर ही ठाकरेंची भूमिका', शिंदेंचा ठाकरेंना टोला
वसई-विरारमध्ये भाजप उमेदवारांकडून ओवाळणी फंडा, प्रचारात पैसे वाटप?

