AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut LIVE | ईडी, सीबीआय आणि एनसीबीचं चिलखत बाजुला ठेऊन समोर या, संजय राऊतांचं अमित शाहांना चॅलेंज

Sanjay Raut LIVE | ईडी, सीबीआय आणि एनसीबीचं चिलखत बाजुला ठेऊन समोर या, संजय राऊतांचं अमित शाहांना चॅलेंज

| Edited By: | Updated on: Dec 20, 2021 | 12:24 PM
Share

पुण्यात येऊन खोटं बोलू नका, पुण्यात शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवला, गृहमंत्र्यांना काम नसेल तर त्यांनी आम्हाला सांगावं ,कर्नाटकात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय तुम्ही आम्हाला ज्ञान देऊ नका आम्ही तुमचा आदर करतो, असं राऊत म्हणाले.

देशाचे गृहमंत्री आमच्या पुण्यनगरीत आले होते, आमच्याविषयी प्रश्न उपस्थित करून भ्रमित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. फक्त सत्तेसाठी वाटा मिळविण्यासाठी 2014 साली शिवसेनेला दूर करा हे सांगणारे कोण होते हे शाह यांनी स्पष्ट कराव, 2014 साली आम्ही लाट असतानाही चांगला लढलो. 2014 पासून महाराष्ट्रात हिंदुत्वाचा पावलोपावली विश्वासघात करणारे कोण ? याचे उत्तर द्यावं  अशी  मागणी संजय राऊत यांनी अमित शाह यांच्याकडे केली आहे. आम्हालाही अनेक शब्द जोडता येतात, महाराष्ट्राच सरकार उत्तम चाललं आहे, केंद्रांन प्रयत्न करून सुद्धा सरकारचा एक कवचाही उडाला नाही याचं दुःख तुम्हाला आहे. 3, 3 चिलखत घालून तुम्ही महाराष्ट्रात फिरताय सीबीआय. एनसीबी, ईडी, ही चिलखत बाजूला करा, आम्ही शिवाजी महाराजांची अवलाद आहोत, आम्ही समोरून लढतो, असं आव्हान संजय राऊत यांनी अमित शाह यांना दिलं.  पुण्यात येऊन खोटं बोलू नका, पुण्यात शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवला, गृहमंत्र्यांना काम नसेल तर त्यांनी आम्हाला सांगावं ,कर्नाटकात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. तुम्ही आम्हाला ज्ञान देऊ नका आम्ही तुमचा आदर करतो, असं राऊत म्हणाले.