Sanjay Raut : मुख्यमंत्री भेटत नसल्याने खासदारांमध्ये नाराजी, मुख्यमंत्र्यांसोबत खासदारांनी बैठक होईल, शिवसेना नेते संजय राऊतांची माहिती
मुख्यमंत्री भेटत नसल्याने खासदारांमध्ये नाराजी आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांसोबत खासदारांनी बैठक होईल, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊतांनी दिली आहे. काल शिवसेना खासदारांची बैठक झाली.
नवी दिल्ली: मुख्यमंत्री (CM) भेटत नसल्याने खासदारांमध्ये (MP) नाराजी आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांसोबत खासदारांनी बैठक होईल, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊतांनी (Sanjay Raut) दिली आहे. काल शिवसेना खासदारांची बैठक झाली. त्याबाबतची माहिती राऊतांनी दिली. काही खासदारांनी काही भूमिका मांडल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सूचनेने शिवसंवादाच्या निमित्ताने खासदार विदर्भात गेले होते. त्यांनी अहवाल तयार केला आहे. संसदेचं अधिवशेन संपल्यावर उद्धव ठाकरेंसोबत सर्व खासदारांची बैठक होईल. या दौऱ्यात जो अनुभव आला त्यावर आणि संघटनात्मक त्रुटीवर चर्चा केली जाईल. खासदारांच्या काही तक्रारी आहेत असं तुम्ही म्हणता त्यात तथ्य नाही. काही ठिकाणी मजबुतीने काम करावं लागेल हे मात्र खरं आहे. शिवसेनेच्या मंत्र्याबाबत बोलता येणार नाही. आघाडी म्हणून प्रत्येक मंत्र्याचं कर्तव्य आहे. महाविकास आघाडीतील प्रत्येक घटकाचं ऐकलं पाहिजे. त्याला मदत केली पाहिजे. इतर पक्षाचा पालकमंत्री असेल तर तो दुसऱ्या पक्षाकडे दुर्लक्ष करतो. या गोष्टी कॉमन आहेत. सरकार तीन पक्षाचं आहे. त्याबाबत काही सूचना दिल्या पाहिजे, असं राऊत म्हणाले.
Published on: Apr 05, 2022 12:50 PM
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी

