AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : '...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून राऊत म्हणाले, संभाजी महाराजांचा संघर्ष आपल्या वाट्याला...

Sanjay Raut : ‘…उनपर है धिक्कार’, नाशिकच्या निर्धार शिबिरातून राऊत म्हणाले, संभाजी महाराजांचा संघर्ष आपल्या वाट्याला…

| Updated on: Apr 16, 2025 | 6:08 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिकमध्ये आज निर्धार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी संजय राऊत यांनी आपल्या भाषणातून नाशिकमधील पराभवावर भाष्य करत कवीभूषण यांच्या काही ओळी सादर केल्यात.

नाशिकमध्ये आज शिवसेना ठाकरे गटाचे निर्धार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बडे नेते पदाधिकारी देखील उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आपल्या भाषणात कवीभूषण यांची एक कविता सादर केली. या कवितेच्या माध्यमातून संजय राऊत यांनी शिवसैनिकांच्या बाहुत बळ भरण्याचं प्रयत्न केला. नाशिकमध्ये झालेल्या निवडणुकीच्या पराभवावर बोलतांना राऊत म्हणाले, ‘अनेकांना वाटलं पराभव झाला. शिवसैनिक खचला असेल. शिवसैनिक घरी बसला असेल. दहशतीखाली आहे असं अनेकांना वाटलं असेल. पण आजच्या शिबीराने दाखवून दिलं नाशिकचा शिवसैनिक खणखणीत आहे. अशा पराभवाने आम्ही खचून जाणार नाही. या पेक्षा वाईट काळ आपण पाहिला आहे. स्वत: शिवसेना प्रमुखांनी अनुभवला आहे. सगळ्या खराब काळाची जी व्यक्ती साक्षी असते ती उज्जवल भवितव्याची निर्माते असते’.

पुढे राऊतांनी छावा चित्रपटाचा उल्लेख केला ते म्हणाले, छावा नावाचा सिनेमा आला. त्यात संभाजी महाराजांचा संघर्ष पाहिला. तो संघर्ष आपल्या वाट्याला आला. तेव्हा कवी भूषण होता. जेव्हा संभाजी महाराज निराश झाले. चारही बाजूने घेरले गेले. तेव्हा काय करावे हा प्रश्न पडला. तेव्हा कवीभूषणने एक मंत्र दिला. तो आपल्या शिवसेनेसाठीही महत्त्वाचा आहे. कवीभूषण म्हणतो, मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गये जो बिना लडे उनपर है धिक्कार….

Published on: Apr 16, 2025 06:02 PM