Sanjay Raut : संजय राऊतांकडून राज ठाकरे आणि नारायण राणेंचं तोंड भरून कौतुक!
Sanjay Raut Appraised Raj Thackeray And Narayan Rane : खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि नारायण राणे यांचं कौतुक करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
राज ठाकरे आणि नारायण राणे यांनी पक्ष सोडल्यानंतर शिवसेनेवर दावा केला नाही, असं शिवसेना उबठा गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. राज ठाकरे आणि राणे यांनी स्वत:चा पक्ष काढला, शिवसेनेवर दावा केलेला नाही. पक्ष काढला म्हणून त्यांच कौतुक वाटतं, असं म्हणत राऊतांनी राज ठाकरे आणि नारायण राणे यांचं तोंड भरून कौतुक देखील यावेळी केलेलं आहे.
यावेळी प्रसार माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत संजय राऊत म्हणाले की, ‘मी नेहमी दोन लोकांचं कौतुक करतो. ते म्हणजे राज ठाकरे आणि नारायण राणे. त्यांनी दोघांनीही शिवसेना सोडल्यावर स्वत:चा पक्ष काढला. माझी शिवसेना ही, मीच या शिवसेनेचा प्रमुख आहे असा दावा त्यांनी कधीही केला नाही. नारायण राणे यांना पक्ष चालवायला जमला नाही, ते दुसऱ्या पक्षात गेले. राज ठाकरे यांनी देखील पक्ष सोडल्यावर स्वत:चा वेगळा पक्ष काढला. एकनाथ शिंदेंसारख माझी शिवसेना खरी आणि मीच बाळासाहेब ठाकरे असं सांगितलं नाही, असं म्हणत राऊतांनी शिंदेंना खोचक टोला लगावला आहे.