धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?; त्या बड्या नेत्याने नावच सांगून टाकलं

धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?; त्या बड्या नेत्याने नावच सांगून टाकलं

| Updated on: Jul 25, 2026 | 4:35 PM

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशाच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी उभारलेल्या आंदोलनानंतर हा राजीनामा झाल्याने विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा देशातील तरुणांच्या संघर्षाचा आणि आंदोलनाचा मोठा विजय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आंदोलकांसमोर झुकणार नसल्याची भूमिका घेतली होती. मात्र, गेल्या १२ वर्षांत प्रथमच विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे केंद्रातील एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आहे. हा संपूर्ण देशातील तरुणाईच्या संघर्षाचा विजय असून देशाने या युवकांचे आभार मानले पाहिजेत.”

पुढे बोलताना त्यांनी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी सहन केलेल्या संघर्षाचाही उल्लेख केला. “या आंदोलनात अनेक तरुणांना लाठीमाराचा सामना करावा लागला, रक्त सांडले आणि अनेकांना गंभीर दुखापती झाल्या. हा विजय सहज मिळालेला नाही, तर त्यासाठी तरुणांनी मोठी किंमत मोजली आहे,” असे राऊत म्हणाले.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षणमंत्रिपदाची जबाबदारी कोणाकडे जाणार, याबाबतही संजय राऊत यांनी भाष्य केले. “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल हे दिल्लीत आहेत. माझ्या मते धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळू शकते. ते उच्चशिक्षित असून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे. दिल्लीच्या राजकीय वर्तुळातही अशा चर्चांना सुरुवात झाली आहे,” असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या उत्तराधिकारीबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसून, शिक्षणमंत्रिपद कोणाकडे सोपवले जाणार याकडे आता देशाचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 25, 2026 4:35 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us