Sanjay Raut : तुम्ही आम्हाला सांगू नका, राऊतांचा फडणवीसांवर पलटवार
ठाकरे बंधूंच्या युतीवरून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेवर आज खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.
हा विषय आधीच चर्चेत आहे की या मोर्चात पक्षीय लेबल लावू नका.हे जरी खरे असले तरी या सोहळ्याचे आयोजन शिवसेना आणि मनसे एकत्रच करत आहे. दुसरे कोणी करत नाही. या संदर्भातल्या बैठका दोन पक्षातच होत आहेत. या संदर्भात चर्चा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातच होत आहे, हे देखील दुर्लक्षित करता येणार नाही, असं खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीसंदर्भात राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत एक विधान केले. युती आणि आघाड्यांचा विचार निवडणुकांच्या वेळी करू. मराठी भाषिकांच्या या विजयाला कुठलेही पक्षीय लेबल लावू नका, असं त्यांनी म्हंटलं होतं. त्यावर राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी राऊतांनी फडणवीस यांच्यावर देखील टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जीआर काढल्यामुळे शिवसेनेची स्थापना झालेली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी जीआर काढल्यामुळे मराठी माणसे एकत्र आलेले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना फोडण्याचा जीआर काढला तरी देखील मराठी माणूस एकत्रच आहे. त्यामुळे जीआरच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू नका, अशी टीका त्यांनी केली आहे. दोन ठाकरे बंधू एकत्र येऊ नये असा काही जीआर आम्ही काढला नाही, त्यांनी एकत्र यावं आणि किक्रेट खेळावं, जेवण करावं. आम्हाला त्याचा काही फरक पडणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल म्हंटलं होतं.

ज्याने धमकी दिली त्यालाच Tv9 चा कॉल, आव्हाडांबाबत विचारताच म्हणाला...

ते ज्या प्रकारे वागले..; बैठकीनंतर प्रकाश महाजनांनी दिली मोठी अपडेट

बदला म्हणून न्याय नको तर... ज्ञानेश्वरी मुंडे नक्की काय म्हणाल्या?

मोरियाने तोंड उघडलं तर तुमचं मोरया होईल.. ; शिंदेंनी कोणाला फटकारल?
