Sanjay Raut | ही लढाई क्रांती रेडेकरविरोधात नाही : संजय राऊत

अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. त्यात मी मराठी मुलगी आहे. माझ्यावरील अन्याय दूर करा, असं आवाहन क्रांतीने मुख्यमंत्र्यांकडे केलंय. त्यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 'हे जे महाराष्ट्रात तुम्हाला चित्र दिसत आहे ते व्यक्तिगत नाही. ते एनसीबीचा एक अधिकारी ज्यानं काहीतरी चूक केलीय, असं लोकांचं मत आहे. त्याचे काही पुरावेही समोर आले आहेत. ही त्यांच्याविरोधात चाललेली लढाई आहे. ही क्रांती रेडकर विरोधातील लढाई नाही, असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे.

समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर वानखेडे यांची पत्ती आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. त्यात मी मराठी मुलगी आहे. माझ्यावरील अन्याय दूर करा, असं आवाहन क्रांतीने मुख्यमंत्र्यांकडे केलंय. त्यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘हे जे महाराष्ट्रात तुम्हाला चित्र दिसत आहे ते व्यक्तिगत नाही. ते एनसीबीचा एक अधिकारी ज्यानं काहीतरी चूक केलीय, असं लोकांचं मत आहे. त्याचे काही पुरावेही समोर आले आहेत. ही त्यांच्याविरोधात चाललेली लढाई आहे. ही क्रांती रेडकर विरोधातील लढाई नाही. आमचे मंत्री, आमचे इतर नेते असतील त्यांच्या घरावर धाडी घातल्या जात आहेत. आमच्या भावना गवळी मराठी नाहीत का? ती ही महिलाच आहे ना. अजित पवारांच्या बहिणी मराठी नाहीत का? अनिल परब मराठी नाहीत का?’, असं प्रत्युत्तर दिलंय.

दरम्यान, ‘राजकारणात असलो तरी कधी मंत्री व्हावं असं वाटलं नाही. कारण, मला केंद्रीय मंत्री होण्यापेक्षा सामनाचा संपादक असणं महत्वाचं होतं’, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलंय. ते आज पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यानमालेत बोलत होते. बदलत्या परिस्थितीत प्रसार माध्यमांपुढील आव्हाने या विषयावर राऊत यांनी आपली भूमिका मांडली.

भाषिक वृत्तपत्र देशाचा राज्याचा आधार आहेत. राजकारणात असलो तरी कधी मंत्री व्हावं अस वाटलं नाही. कारण, मला केंद्रीय मंत्री होण्यापेक्षा सामनाचा संपादक असणं महत्वाच होतं. मी संपादक झालो तेव्हापर्यत कधीच अग्रलेख कधीच लिहला नव्हता. सामान्य माणसाची व्यथा मांडतो म्हणजे राजकारणच आहे. कुमार केतकर हे बाहेर भूमिका मांडूनच राज्यसभेत गेले. पण ते तिकडे गेल्यावर सोनिया गांधी यांची भूमिका मांडताना ते दिसत नाहीत. त्यामुळे भूमिका मांडत राहील पाहिजे, जी आम्ही मांडतो, असा सल्लाही राऊतांनी केतकरांना दिलाय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI