आता थेट नाव घ्या… संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं

आता थेट नाव घ्या… संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं

| Updated on: Jun 07, 2026 | 1:36 PM

शिवसेना शिंदे गटातील संजय शिरसाट यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी सुप्रिया सुळेंच्या एका विधानाचा उल्लेख करत सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटातील सुप्रिया सुळेंनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजारी झाली. भाजपने माझे तोडं उघडायला लावू नये कारण माझ्याकडे पुरावे आहेत. मी या घोडेबाजारीबाबत एक प्रस्ताव मांडणार आहे. या विधानावर अनेकांनी प्रत्युत्तर दिले. दरम्यान, शिरसाट म्हणाले, सुप्रिया सुळेंना जर घोडेबाजारी झाल्याचे वाटत असेल तर त्यांनी समोर आणावे आणि हो, थेट नाव घ्यावे, लोकांनाही कळायला हवे खरे काय?

एकूणच विरोध पक्षातील उमेदवारांच्या माघारीवरून राजकारण पेटले आहे. त्यात आता शिरसाटांच्या या खुल्या आवाहनाने भर पाडली आहे. या प्रकरणी पुढे नेमके काय घडेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय.

Published on: Jun 07, 2026 1:36 PM
Follow Us