Sanjay Shirsat | ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट, ‘अनेक नेते आमच्या संपर्कात, त्यापैकी…’ संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
नुकतीच शिवसेना शिंदे गटातील संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर भाष्य केले. मुख्यत्वे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या विधानपरिषदेवर जाण्याबाबत आणि ऑपरेशन टायगर बाबत मोठे विधान केले आहे.

संजय शिरसाट म्हणाले, “ऑपरेशन टायगर हे योग्य वेळीच होईल… अनेक जण आमच्या संपर्कात आहेत, हे ऑपरेशन काही सांगून करण्यात येणार नाही. निर्णय कधी घ्यायचा हे शिंदेंवर आहे. ते ज्या दिवशी निर्णय घेतील आणि ऑपरेशन टायगर होईल, तेव्हा राज्यात पुन्हा मोठा भूकंप येईल.’
संजय शिरसाटांच्या वक्तव्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वीदेखील संजय शिरसाटांनी ऑपरेशन टायगर विषयी मत मांडले होते. इतकेच नाही, तर ठाकरे गटातील अनेकांशी संपर्क असल्याचा दावाही केला होता.
Published on: Apr 25, 2026 03:29 PM
Follow Us