Mumbai Accident : सांताक्रूझ पुलावर भीषण अपघात, शिवसेना उपशाखा प्रमुखांच्या मुलाचा मृत्यू
Mumbai Car Accident News : मुंबईच्या सांताक्रूझ पुलावर शुक्रवारी भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये शिवसेना उपशाखा प्रमुखांच्या मुलाचा समावेश आहे.
मुंबईच्या सांताक्रूझ पुलावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये शिवसेना उपशाखा प्रमुख विनोद पटेल यांचा मुलगा असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर 4 आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच याठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती. घटनेत दोन मृत असून त्यातील एक शिवसेना उपशाखा प्रमुख विनोद पटेल यांचा मुलगा आहे.
Published on: Mar 07, 2025 12:45 PM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

