Santosh Bangar : आमदार संतोष बांगर संभाजीनगरच्या डॉक्टरवर संतापले; ऑडिओ क्लिप व्हायरल
MLA Santosh Bangar Audio Clip : छत्रपती संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरवर आमदार संतोष बांगर संतापले आहेत. रुग्णाकडून अवाजवी बिल घेतल्याने त्यांनी डॉक्टरला धारेवर धरलं.
डेंग्यू तापाच्या रुग्णाचं बिल 6 लाख रुपये कसं? रुग्णाला अमृत पाजलं का? असा प्रश्न विचारत आमदार संतोष बांगर हे छत्रपती संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरवर संतापले आहेत. डॉक्टरांशी झालेल्या या संभाषणाची बांगर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. दरम्यान, टीव्ही 9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.
डेंग्यू झालेल्या रुग्णाकडून 6 लाख घेणं कितपत योग्य आहे? रुग्णाची कंडिशन खराब आहे असं तुम्ही म्हणता डॉक्टरसाहेब पण एवढे पैसे घ्यायला तुम्ही काय अमृत पाजलं का? असे प्रश्न विचारत बांगर यांनी रुग्णालयाच्या डॉक्टरला चांगलच धारेवर धरलं आहे.
Published on: Apr 11, 2025 12:54 PM
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

