Santosh Deshmukh Case : सणाच्या दिवशी गावकरी झाले भावुक, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय
जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या हत्येस कारणीभूत असलेल्या आरोपींना शिक्षा होणार नाही तोवर गावात सूतक पाळलं जाणार असल्याचा निर्णय मस्साजोगच्या ग्रामस्थांनी घेतला आहे.
मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 3 महीने उलटून गेले आहेत. अद्यापही या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नाही. आरोपींना ताब्यात घेतलेलं असलं तरी कृष्णा आंधळे या मुख्य आरोपीचा शोध अजून सुरूच आहे. जय निर्घृणपणे संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. या संपूर्ण पार्श्वभूमीवर मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आज अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या तीन महिन्यात गावात कोणताही सण साजरा झालेला नाही. आज परंपरेने साजरी होणारी होळी देखील या ठिकाणच्या ग्रामस्थांनी साजरी केलेली नाही. जोवर संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा होत नाही तोपर्यंत गावात कोणताही सण साजरा करण्यात येणार नसल्याचा निर्णय या ग्रामस्थांनी घेतलेला आहे. त्यामुळे कोणताही आनंदोत्सव गावात साजरा होणार नसल्याचं सांगितलं आहे. कुटुंबात सूतक हे 10 दिवसांचं असतं मात्र ज्या दिवशी आरोपींना शिक्षा होईल त्याच दिवशी आमचं सूतक संपेल, असं यावेळी बोलताना गावकऱ्यांनी सांगितलं आहे.