भेटायला जायला ते काय आयसीयूत गेले होते की कोमात? मनोज जरांगे संतापले
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण दोन महिने राज्यात हे प्रकरण लावून धरणारे भाजपा आमदार सुरेश धस यांनी ज्यांना आकाचा आका म्हणून डिवचले त्या धनंजय मुंडे यांच्या घरी जाऊन त्यांची त्यांची भेट घेतल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणात मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी देखील धस यांनी मराठ्यांचा विश्वास घात केल्याचे म्हटले आहे.
धस हे कट्टर आणि निर्भीड माणूस होता..आहे इतक्या गुडघे टेकवेल इतक्या लवकर हा गडी कंबर वाकवेल असं वाटलं नव्हते असा मोजक्या आणि शेलक्या शब्दात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी भाजपा आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीबाबत म्हटले आहे. सुरेश धस चांगले राजकारणी होते. मला तर हे स्वप्न पडल्या सारखे वाटत आहे. यांना राजकारण करायचं असेल, आरोपींना सोडून द्यायचे असेल परंतू मी जोपर्यंत जीवंत आहे तोपर्यंत हा लढा चालू राहील प्रत्येक आरोपीला शिक्षा झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही असेही जरांगे यांनी म्हटले आहे. भेटायला जायला ते काय आयसीयूत गेले होते की कोमात? अशा शब्दात मनोज जरांगे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. या राज्याला काळिमा फासलेले हे हत्याकांड महाराष्ट्राने यापूर्वी कधी पाहीले नव्हते. एक मराठ्याला न्याय देण्यासाठी इतक्या लवकर दगेची अपेक्षा नव्हती ? असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.