मला बदनाम करण्याचा BJP चा डाव- नाना पटोले
राजकीय विरोध असू शकतो. पण, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे चांगले मित्र आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधातील पिटीशनमध्ये सतीश उके (Satish Uke) हे माझे वकील आहेत. रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणामध्येही ते माझे वकील आहेत. वकील आपली केस लढतात. याचा अर्थ सतीश उके हे नाना पटोलेंचे वकील, अशी हवा तयार केली जात आहे.
नागपूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे मुंबईवरून एकाच विमानानं नागपूरला आले. या दोन्ही नेत्यांनी एकाच विमानातून प्रवास केला. नाना पटोले म्हणाले, राजकीय विरोध असू शकतो. पण, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे चांगले मित्र आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधातील पिटीशनमध्ये सतीश उके (Satish Uke) हे माझे वकील आहेत. रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणामध्येही ते माझे वकील आहेत. वकील आपली केस लढतात. याचा अर्थ सतीश उके हे नाना पटोलेंचे वकील, अशी हवा तयार केली जात आहे. हे भाजपचे मला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
Published on: Apr 01, 2022 1:38 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
