शिंदेगटाचे आमदार शहाजीबापू पाटील आणि भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी एकमेकांना आलिंगन दिलं. गडाख-घुले विवाहसोहळ्या दरम्यान या दोन नेत्यांची भेट झाली. तेव्हा या दोघांनी गळाभेट घेतली. यावेळी दोघांमधील हास्यविनोदांमुळे उपस्थितही खळखळून हसले. सुजय विखे पाटील यांना भेटून आनंद झाला, असं शहाजीबापू पाटील यावेळी म्हणाले.