सरकार सत्तेत आल्यावर कामाख्या देवीचं दर्शन घ्या, कुणी सांगितलं होतं? शहाजीबापूंनी उघडपणे सांगितलं…

आयेशा सय्यद, Tv9 मराठी

Updated on: Nov 26, 2022 | 1:06 PM

कामाख्या देवीचं दर्शन घेण्याचं कुणी सांगितलं होतं?, शहाजीबापू म्हणाले...

मुंबई : शिंदेगटाने बंडखोरी केल्यानंतर आधी सूरत आणि मग गुवाहाटीला जाऊन सत्तेची गणितं आखली गेली. तेव्हा शिंदेगटाने गुवाहाटीतील कामाख्या देवीचं (Kamakhya Devi Darshan) दर्शन घेतलं. त्यानंतर आज पुन्हा एकदा शिंदेगट गुवाहाटीला गेलाय. हे सगळे आमदार, मंत्री पुन्हा गुवाहाटीला का गेले याचं उत्तर आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिलंय. ” सत्तासंघर्षाच्या काळात आम्ही कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. तेव्हा तिथल्या पुजाऱ्यांनी सांगितलं होतं की, सरकार सत्तेत आल्यावर पुन्हा देवीच्या दर्शनासाठी या. म्हणून आम्ही दर्शनासाठी जातोय”, असं शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी सांगितलं.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI