Sharad Koli : भाजपने देशपांडेंच्या पत्नीला शासकीय पद दिलं; शरद कोळी यांचा मोठा दावा
Sharad Koli On Sandeep Deshpande : संदीप देशपांडे यांच्याकडून होणाऱ्या टीकेवर आता ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
संदीप देशपांडे यांचं पद मनसेचं आणि काम भाजपचं आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी केली आहे. भाजपने देशपांडे यांच्या पत्नीला शासकीय पद दिल्याचं देखील शरद कोळी यांनी म्हंटलं आहे. देशपांडे यांना ठाकरेंची सेना आणि मनसेची युती होऊ द्यायची नाही. पण काहीही झालं तरी शिवसेना आणि मनसे युती होणारच असंही दावा कोळी यांनी केला आहे.
संदीप देशपांडे यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शिवसेना ठाकरे गटावर टीका केली जात आहे. एकीकडे ठाकरे बंधु एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच संदीप देशपांडे यांच्याकडून होणाऱ्या टीकेच्या भडीमाराने या युतीत मिठाचा खडा पडणार का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. त्यावर आता ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी प्रतिक्रिया दिली असून संदीप देशपांडे यांना ठाकरे बंधूंची युती होऊ द्यायची नसल्याचं म्हंटलं आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

