AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! पवार परिवारात राजकीय खलबतं; शरद पवारांची कुटुंबातील सदस्यांसोबत क्लोज डोअर बैठक होणार, सुनेत्रा पवारांसह....

मोठी बातमी! पवार परिवारात राजकीय खलबतं; शरद पवारांची कुटुंबातील सदस्यांसोबत क्लोज डोअर बैठक होणार, सुनेत्रा पवारांसह….

| Updated on: Apr 28, 2026 | 12:56 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना नुकताच मुंबईतील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी आज पुण्यातील आपल्या ‘मोदी बाग’ निवासस्थानी पवार कुटुंबाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे, असं सूत्रांकडून सांगितलं जातंय. अचानक बोलावलेल्या या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना नुकताच मुंबईतील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी आज पुण्यातील आपल्या ‘मोदी बाग’ निवासस्थानी पवार कुटुंबाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे, असं सूत्रांकडून सांगितलं जातंय. अचानक बोलावलेल्या या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, तसेच राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार आणि पार्थ पवार उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जय पवार सध्या परदेशात आहेत.
दरम्यान, 23 एप्रिल रोजी झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीनंतर पवार कुटुंबातील राजकीय समीकरणांवर चर्चा सुरू झाली आहे. जय पवार यांनी 2029 मध्ये बारामतीतून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. तर दुसरीकडे, युगेंद्र पवार हे शरद पवार गटाकडून संभाव्य उमेदवार असू शकतात, अशी चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर 2029 मध्ये बारामतीत ‘पवार विरुद्ध पवार’ अशी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत या विषयावर महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात असून, शरद पवार यांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Published on: Apr 28, 2026 12:56 PM
Follow Us