AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट

tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट

| Updated on: Jun 12, 2026 | 10:28 AM
Share

राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोलापुरात मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. पक्षातील नाराजीचे पडसाद आता उघडपणे दिसू लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे तीन आमदार भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या भूमिकेत असल्याचे चित्र समोर आले आहे.

सोलापूरमध्ये विधान परिषद निवडणुकीसंदर्भात महायुतीची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर, माढ्याचे आमदार अभिजित पाटील आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे, शरद पवार गटाकडे सध्या मर्यादित आमदारसंख्या असताना पक्षातील तीन आमदारांनी भाजपच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत पक्षाच्या रणनीतीवर आणि अंतर्गत एकजुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

यामध्ये आमदार उत्तमराव जानकर यांची भूमिका विशेष चर्चेत आहे. यापूर्वी त्यांनी भाजपवर ईव्हीएम संदर्भात गंभीर आरोप करत फेरमतदानाची मागणी केली होती. मात्र आता तेच भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, विधान परिषद उमेदवारीवरून पक्षात निर्माण झालेल्या नाराजीमुळे ही परिस्थिती उद्भवल्याची चर्चा आहे. या घडामोडींमुळे सोलापूरच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता असून, शरद पवार गटाची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 12, 2026 10:28 AM

Follow Us