Special Report | शस्त्रक्रियेनंतर शरद पवार पुन्हा सक्रीय, शेतकरी, व्यापाऱ्यांना मदत करण्याचा सल्ला

Special Report | शस्त्रक्रियेनंतर शरद पवार पुन्हा सक्रीय, शेतकरी, व्यापाऱ्यांना मदत करण्याचा सल्ला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन मोठ्या शस्त्रक्रियांनंतर पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी कोरोना संकटाच्या काळात काही घटकांना मदत करण्याचा सल्ला दिला आहे. राज्यातील शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना मदत द्या, असा सल्ला पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिला आहे. तसेच आज त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत कारमध्ये बाहेर फेरफटका मारला.