धनंजय मुंडे यांना फटकारलं, आव्हाड यांची पाठराखण; शरद पवार यांची सणसणीत चपराक
जितेंद्र आव्हाड यांना पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. तर जितेंद्र आव्हाड यांनी काय बोलावे काय बोलू नये हे सांगण्याचा अधिकार इतरांना नाही, असे शरद पवार यांनी म्हटले असून धनंजय मुंडे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केलेल्या टीकेवर शरद पवार यांनी जशास जसं प्रत्युत्तर
मुंबई, १७ फेब्रुवारी २०२४ : शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची शरद पवार यांच्याकडून पाठराखण केल्याचे पाहायला मिळाले. जितेंद्र आव्हाड यांना पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. तर जितेंद्र आव्हाड यांनी काय बोलावे काय बोलू नये हे सांगण्याचा अधिकार इतरांना नाही, असे शरद पवार यांनी म्हटले असून धनंजय मुंडे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केलेल्या टीकेवर शरद पवार यांनी जशास जसं प्रत्युत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. तर पवार यांचं घर फोडण्याचं काम जितेंद्र आव्हाड यांनी केलं असं म्हणत राज्याचे मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका करत आरोप केला होता. तर आव्हाड यांच्यामुळेच दोन्ही पवारांमध्ये अंतर वाढले. तसेच शरद पवार गटात स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी आव्हाड बोलत असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले होते. त्यावरच शरद पवार यांनी भाष्य करत सणसणीत चपराक दिली.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

