“फडणवीस कदाचित प्राथमिक शाळेत असतील, त्यामुळे…”, शरद पवार यांचा खोचक टोला

“फडणवीस कदाचित प्राथमिक शाळेत असतील, त्यामुळे…”, शरद पवार यांचा खोचक टोला

apeksha sakpal | Updated on: Jun 26, 2023 | 3:14 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली तर ती मुत्सद्देगिरी आणि तेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले तर गद्दारी? अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. फडणवीस यांच्या या टीकेला शरद पवार यांनी पलटवार केला आहे.

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली तर ती मुत्सद्देगिरी आणि तेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले तर गद्दारी? अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. फडणवीस यांच्या या टीकेला शरद पवार यांनी पलटवार केला आहे. “मी बेईमानी कधी केली? कधी केली बेईमानी फडणवीस यांनी सांगावं. 1977 मध्ये आम्ही सरकार बनवलं. त्यावेळचा जनसंघ म्हणजे आताचा भाजप माझ्यासोबत होता. उत्तमराव पाटील भाजपचे नेते होते. ते माझ्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. फडणवीस लहान होते तेव्हा त्यामुळे त्यांना कळलं नसेल. त्यांना पूर्वीचा इतिहास माहीत नसेल. मी जे सरकार बनवलं ते सर्वांना घेऊन केलं. त्या सरकारमध्ये जनसंघाचे हशू आडवाणी होते. आणखी काही सदस्य होते. फडणवीस कदाचित प्राथमिक शाळेत असतील, त्यामुळे त्यांना त्याची माहिती नसेल. त्यामुळे अज्ञानापोटी ते असं स्टेटमेंट करतात. त्यापैकी वेगळं काही नाही,” असं शरद पवार म्हणाले.

Published on: Jun 26, 2023 3:14 PM
Follow Us