Narendra Modi | पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर शरद पवार यांची पोस्ट चर्चेत, म्हणाले….
देशातील सध्याच्या आर्थिक आणि राजकीय परिस्थितीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता असल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी केली आहे.

शरद पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत देशातील वातावरणाबाबत चिंता व्यक्त केली. “सामान्य नागरिक, उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं आहे. गुंतवणूकदारांमध्येही चिंतेचे वातावरण असून ही बाब निश्चितच काळजी वाढवणारी आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पंतप्रधानांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करून सर्व पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याचेही पवार यांनी नमूद केले. “देशहितासाठी निर्णय प्रक्रिया सर्वांना विश्वासात घेऊन राबवली पाहिजे. सध्याच्या परिस्थितीचा सखोल आढावा घेण्यासाठी तातडीने बैठक बोलावण्याची गरज आहे,” असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, केंद्र सरकार यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: May 12, 2026 02:14 PM
पवनराजेंच्या हत्येपासूनचा वैर अन्... पद्मसिंह पाटलांच्या मुलाचं ओमराजे
आमदारकीचं गुपित उघडलं? देवाभाऊंकडे दैवी शक्ती...; त्या नेत्याच्या
निधी मिळत नाही कारण...निधी का दिला जात नाही? अंधारेंनी उघड केलं सत्य
नेते काँग्रेसचे मात्र मतं गेली महायुतीला... बड्या नेत्याने अखरे सांगित