‘पुरावे असतील तर सरकारला द्या’; राऊत यांना शिंदे गटातील नेत्यानं खडसावलं
याचदरम्यान त्यांनी साडेसातशे कोटी रुपयांचं मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावरून सध्या खळबळ उडाली आहे. याचमुद्द्यावरून शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे.
मुंबई : वेगवगळ्या कारणांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत भर पडतानाच दिसत आहे. त्यांच्यावर मोठ्या घोटाळ्याचे आरोप झाले आहेत. याचदरम्यान त्यांनी साडेसातशे कोटी रुपयांचं मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावरून सध्या खळबळ उडाली आहे. याचमुद्द्यावरून शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे. तर त्यांना आवाहन करत असतील पुरावे तर द्या असं म्हटलं आहे. शिरसाट यांनी, राऊत यांच्याकडून रोज आरोप करण्यात येतात. तर ते वेगवेगळ्या मंत्र्यांना टार्गेट करतात. त्यांचे हे आता रोजचेच झाले आहे. पण तुमच्याकडे जर काही पुरावे असतील तर ते सरकारला द्या, दाखवा फक्त आरोप करून कोणाला भ्रष्टाचारी म्हणून तसं ठरवून चालणार नाही असं म्हटलं आहे.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

