उमेदवार तेच पण पक्ष नवा? कसं असणार शिरूरचं समीकरण? कोणामध्ये रंगणार सामना?
शिरुर लोकसभा मतदारसंघाचा सामना जवळपास फिक्स झालाय. महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे उमेदवार म्हणून अमोल कोल्हे तर त्याविरोधात अजित पवार यांच्या चिन्हावर शिंदेंचे नेते शिवाजीराव अढळराव पाटील हे निवडणूक लढवणार
मुंबई, २१ मार्च २०२४ : शिरुर लोकसभा मतदारसंघाचा सामना कोणामध्ये होणार हे अखेर ठरलंय. उमेदवार तेच मात्र पक्ष नवा….असाच काहिसा सामना रंगताना दिसणार आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार यांच्या घड्याळ या चिन्हावर लढणार असून ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघाचा सामना जवळपास फिक्स झालाय. महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे उमेदवार म्हणून अमोल कोल्हे तर त्याविरोधात अजित पवार यांच्या चिन्हावर शिंदेंचे नेते शिवाजीराव अढळराव पाटील हे निवडणूक लढवणार आहेत. शिरूरमध्ये महायुतीचा उमेदवार कोण? याबाबत बरीच शोधाशोध झाली. दरम्यान, नाना पाटेकर यांच्या नावाचीही चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र अमोल कोल्हे यांच्याविरोधात शिवाजीराव अढळराव पाटील हे निवडणूक लढवणार यावर एकमत झालं. पण यंदा शिवाजीराव अढळराव पाटील हे शिंदेच्या चिन्हावर न लढता अजित पवार गटात प्रवेश करून त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

